Mumbai- Agra Highway Accident News: Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: वडिलांच्या अंत्यविधीला जाताना काळाचा घाला! भरधाव कारची कंटेनरला धडक; २ मुलींसह जावई ठार

Mumbai- Agra Highway Accident News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. मुंबई वरळीमधील हिट अँड रन प्रकरण, नाशिकमध्ये मुलीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

अजय सोनवणे| नाशिक, ता. ११ जुलै २०२४

नाशिकमधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव जवळील वाके शिवारात उभ्या असलेल्या कंटनेरला भरधाव कार धडकल्याने दोन मुलींसह जावई ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. वडिलांच्या अंत्यविधीला जाताना काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. मुंबई वरळीमधील हिट अँड रन प्रकरण, नाशिकमध्ये मुलीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव जवळील वाके शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, कारमधील कुटुंब हे वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. नाशिकच्या मालेगावजवळील वाके शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटनेरवर त्यांची भरधाव पंच कार आदळली.

यामध्ये दोन मुलींसह जावई जागीच ठार झाले. मिनाक्षी अरुण हिरे,सुनंदा विकास सावंत व विकास चिंतामण सावंत असे तिघांची नाव असून यात नात वैभवी प्रविण जाधव ही जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT