Maharashtra Politics : तू जे पैसे खाल्ले, त्यातील मला १० कोटी दे; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

former mla ramesh kadam : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला धमकी मिळाल्याची बाब समोर आली आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं बोललं जात आहे.
Ramesh kadam
Ramesh kadamsaam Tv
Published On

मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठं वृत्त हाती आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाल्याची बाब समोर आली आहे. या धमकीनंतर रमेश कदम यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर रमेश कदम यांनी विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 'तू जे पैसे खाल्ले, त्यातील मला १० कोटी दे, असं म्हणत धमकी दिल्याची तक्रार रमेश कदम यांनी नोंदवली आहे. या धमकीनंतर राजकीय वर्तळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाली आहे. विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आगे. यानंतर रमेश कदम यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर विरोधात कुलाबा पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

Ramesh kadam
PCMC Crime News: पिंपरी हादरलं! आंतरधर्मीय लग्नाचा थरारक बदला...

रमेश कदम यांचा आरोप काय?

रमेश कदम हे २१ जून रोजी दहिसर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्हाच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात ही घटना घडली आहे. प्रवीण चव्हाण यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप रमेश कदम यांनी केला. 'तू जे पैसे खाल्ले, त्यातील १० कोटी मला दे, नाहीतर जेलमधून तू कधीच सुटणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप रमेश कदम यांनी केला आहे.

Ramesh kadam
Amravati Crime News : भावी डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं अमरावतीत खळबळ

रमेश कदम यांच्या आरोपानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात ३८४, ५०६ भादंवी कलमासह ३(१) आर, ३(१) एस, अनुसूचित जाती आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com