Nashik Accident News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: भरधाव कार कंटेनरचा भीषण अपघात! एकाचा जागीच मृत्यू; ३ जखमी

Nashik Accident: नाशिकच्या मनमाड-मालेगाव राज्य महामार्गावर चौंढी घाटात कॅटेनर आणि कार चा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक, ता. २६ नोव्हेंबर २०२३

Nashik Accident News:

नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मनमाड-मालेगाव राज्यमहामार्गा वर चौंढी घाटात कॅटेनर आणि कार चा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मनमाड- मालेगाव राज्य महामार्गावरील चौंढी घाटात रविवारी (२६,नोव्हेंबर) कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. कारमधील चारही तरुण हे शिर्डीकडे जात होते. कंटेनर पलटी होऊन कारवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झालेत.

या अपघाताची माहिती मिळताच चौंढी गावातील नागरिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी केली मदत केली. अपघातातील तिघा जखमींना मालेगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

अपघातानंतर कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला काढून वाहतुक सुरळीत केली.

भंडाऱ्यात भीषण अपघात..

भंडाऱ्यामधून (Bhandara) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भंडाऱ्यामध्ये दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CCTV Video : काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ, भरधाव वेगातील दुचाकीवर भिंत कोसळली

Hingoli : विद्यार्थ्यांची खाजगी संस्थेत आर्थिक पिळवणूक; प्रवेशासाठी २० हजार रुपये आकारल्याचा आरोप

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jewellery Cleaning Tips : सणासुदीला १ रुपया खर्च न करता दागिन्यांची चमक वाढवा, ५ घरगुती उपाय ट्राय करा

Shocking : घृणास्पद! तरुणाचे भटक्या कुत्र्यावर आक्षेपार्ह कृत्य, अत्याचाराचा Video व्हायरल

SCROLL FOR NEXT