Shreya Maskar
सणासुदीला आपण सोन्या-चांदीच्या दागिन्याने साज श्रृंगार करतो. मात्र दागिन्यांची चमक गेली असेल बाहेर न जाता तुम्ही घरगुती उपाय करून दागिने नव्या सारखे चमकवू शकता.
दागिन्यांना महागडे पॉलिशिंग करण्यापेक्षा घरगुती उपायांनी दागिने डायमंडसारखे चमकवा.
बाऊलमध्ये व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून त्यात सोन्याचे दागिने १० मिनिटे भिजत ठेवा.
सोन्याचे दागिने तुम्ही टूथब्रशने देखील स्वच्छ करू शकता.
वाटीत दही आणि लिंबू मिक्स दागिन्यांना लावा आणि कॉटनच्या कपड्याने ज्वेलरी स्वच्छ करा.
दागिन्यांची चमक आणण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा खूप फायदेशीर ठरतो.
एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करून चांदीच्या दागिन्यांना लावा आणि ५-१० मिनिटांनी स्वच्छ करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.