Police initiate action after obscene videos linked to Kharat case go viral on WhatsApp groups in Nashik. saam tv
महाराष्ट्र

Kharat Case : अधिकारी महिलाही जाळ्यात? भोंदू खरात फाईल्समध्ये धक्कादायक माहिती उघड

Kharaat case full details : खरात प्रकरणात आता उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Bharat Mohalkar

सर्वसामान्य महिला, राजकीय नेते, उद्योगपती यांच्यानंतर महिला अधिकारीही खरातच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आलीय.. मात्र या अधिकारी कोण? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

ज्योतिषशास्त्र, तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांच्या शोषणाची खरात फाईल समोर आली... आणि नराधम अशोक खरातचं बिंग फुटलं... खरातच्या जाळ्यात फक्त सर्वसामान्य गरीब घरातील महिलाच नाही तर बडे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योगपती अडकलेत.... एवढंच नाही तर आता दोन उच्चपदस्थ महिला अधिकारी खरातच्या जाळ्यात अडकल्या आहेत...आणि एका महिलेचा तर व्हिडीओ व्हायरल झाल्यानं त्यांचं टेन्शन वाढलंय... तर त्यापैकी एका महिलेनं एसआयटीशी संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

दुसरीकडे पोलीस कोठडीतही खरातची भोंदूगिरी सुरुच आहे...कोठडीत मंत्रजपाचं नाटक करत खरातनं चक्कं निर्लज्जपणे महिलांचं शोषणाच्या कृत्याचं समर्थन केल्याची धक्कादायक माहिती सुत्रांनी दिलीय... महिलांचं लैंगिक शोषण हा एका विधीचाच भाग असल्याचा कांगावा नराधम खरातनं केलाय...

खरातच्या जेलमध्ये उलट्या बोंबा - सूत्र

माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. महिलांसोबतची कृत्य हा विधीचाच भाग असल्याचं वक्तव्य खरातनं पोलीसांपुढं केलाय..एवढंच नाही तर मी कुणावरही जबरदस्ती केली नाही... यापुढं मी फक्त मेंदूचंच ऐकणार, असंही खरात पोलिसांना म्हणाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

खरंतर याआधीच खरातला अटक होण्याचा सुगावा लागताच बड्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत खरातसोबत बैठक घेतली होती... त्यानंतर खरातसोबत जमीन खरेदी व्यवहारात प्रशासकीय अधिकाऱ्याचं कनेक्शन समोर आलं... तर खरात कनेक्शनमुळे एका अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आल्याची चर्चा आहे... त्यामुळे खरातनं बडे नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती निर्माण केली...आता ज्या उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांचं खरात कनेक्शन समोर आलंय... त्यांचं फक्त लैंगिक शोषणच केलंय की खरातने त्यांना ब्लॅकमेल करुन काही काळे कारनामे केलेत का? याचाही सखोल तपास करण्याची गरज आहे...

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही न्यूज..नाशिक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका अविश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT