Harshvardhan Kharat, son of fake godman Ashok Kharat, goes missing amid ongoing SIT investigation in Nashik Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! आधी बायको आता भोंदू बाबाचा मुलगाही फरार; हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Ashok Kharat Son Not Reachable Sit Investigation: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण लागले आहे. पत्नी नंतर मुलगा हर्षवर्धन खरातही फरार झाला असून मोबाईल नॉट रिचेबल असल्याने SIT तपासावर प्रश्नचिन्ह केले जात आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. भोंदूबाबाच्या काळ्या कारनामांची SIT तपासामार्फत रोज नवनवीन यादी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला SIT ने ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बऱ्याचा प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झाला आहे.

हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने तपास यंत्रणांनी खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल येत असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा तेथे सापडला नाही. त्यामुळे हर्षवर्धन खरात चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का? अशा चर्चा सुरू आहे.

आधी पत्नी आता मुलगा फरार, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरात मागच्या अनेक दिवसांपासून फरार असून तिच्या मागावर पोलीस आहे. असे असतानाच आता मुलगा हर्षवर्धन फरार झाल्याने तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चौकशी सुरू असल्याने मुलाने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच खरातचा मुलगा गायब झाला का? की दुसरे कुठले कारण आहे अशी शंका उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच

School Close : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी, रेड अलर्टमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

SCROLL FOR NEXT