Ashok Kharat mobile 2500 codeword contacts investigation details saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: कोडवर्डवाले २५०० नंबर; अशोक खरातच्या मोबाइलमधील मायाजाल पाहून पोलीसही चक्रावले

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातच्या मोबाईलमध्ये मोठा खुलासा झाला आहे. नंबर ‘कोड’मध्ये सेव्ह केल्याने तपास यंत्रणांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Bharat Jadhav

  • खरातचे दोन मोबाईल जप्त, डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू

  • ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी

  • तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात एसआयटीनं आपल्या तपासात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. खरातने मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास एसआयटी करत आहे. अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाइलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या डेटामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. खरातच्या मोबाइलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत.

खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डने सेव्ह करण्यात आलेत. यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे. अशोक खरातच्या मोबाईलमधील मायाजाल पाहून पोलीस चक्रावले आहेत. पोलिसांनी अशोक खरातचे दोन मोबाइल जप्त केले आहेत. त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.

अशोक खरातची पोलीस कोठडी का वाढवली?

भोंदू अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. पलिसांनी त उडावाउडवीची उत्तरे देत असल्यानं तपासला वेळ लागत आहे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी द्यायचा. ते खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत त्यांचे डोके जड व्हायचे. यानंतर अशोक खरात सांगायचा तसे या महिला करायचा हा नेमकं काय प्रकार आहे? याचा तपास पोलिसांनी करायचा आहे.

दरम्यान आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाहीये. खरातने भोंदूगिरी करत किती आणि कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली? खरातने जे कृत्य केले त्यात त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास पोलिसांना करण्यात आला आहे. रविवारी ठाकरे गटाच्या नेत्य सुषमा अंधारे यांनी एका पतसंस्थेच्या प्रमुखाबद्दल धक्कादायक बाब सर्वांसमोर आणली होती. त्यावर काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमाताई अंधारे यांनी काळा पैसा पांढरा करणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्या नाव कोडमध्ये लिहिले असतील.

ज्या व्हिडिओमध्ये सगळं काही आहे, अंधश्रद्धेला खतपाणी घातलं समर्थन केलं आहे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. चाकणकर यांच्यावर कारवाई करून पूर्ण कारवाई झाली असं म्हणता येणार नाही. इतर दोषींवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे इतर मोठ्याच काय? कायदे तयार करणारी मंडळी कायदे मोडण्याचा काम करत असेल तर ते कारवाईस प्राप्त आहेत. खरात एक महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. महाराष्ट्राची शरमेने खाली जाईल अशा पद्धतीचे हे प्रकरण आहे, असं विजय वडेवट्टीवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग? धक्कादायक माहिती समोर; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

मोठी दुर्घटना! कराडमध्ये केमिकल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट अन् अग्नितांडव, पाहा व्हिडिओ

Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

SCROLL FOR NEXT