Kharat Network Under Scanner as SIT Probes Links with Senior Government Officials Saam Tv
महाराष्ट्र

बडे अधिकारीही खरातच्या जाळ्यात? खरातच्या 'दरबारा'तला डेप्युटी कलेक्टर कोण?

Deputy Collector Link Surfaces in Kharat ‘Darbar’ Case: खरातच्या अंधश्रद्धेला एकीकडे मंत्र्यांकडून खतपाणी घातलं गेल्याचा आरोप होतोय... तर दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकारी खरातच्या दरबारात हजेरी लावत असल्याची माहिती समोर आलीय... ते अधिकारी नेमके कोण आहेत? खरात नेटवर्क पोलिसांच्या रडारवर कसं आलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

'कॅप्टन' अशोक खरातच्या पापाचा घडा आता पुरता भरलाय... महिलांवर अत्याचारचं नाही तर अध्यात्माच्या आडून खरातनं उभी केलेली अफाट संपत्ती आता पोलिसांच्या रडारवर आहे...SIT नं खरातचे डिजीटल आणि आर्थिक नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी आता कंबर कसली असून प्रशासनातील काही पांढरपेशी चेहरेही समोर येण्याची शक्यता आहे...खरातच्या नेटवर्कमध्ये बड्या अधिकाऱ्यांची कशी उठबस होती .. पाहूयात...

खरातच्या तथाकथित 'दरबारात' अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वावर होता. चॉईस पोस्टिंगसाठी हे अधिकारी खरातकडे जात होते.. कामांच्या मोबदल्यात खरातला जमिनीत गुंतवणुकीच्या स्वरूपात ‘दक्षिणा’ दिली जात असे... काही वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी-विक्री केल्याचा संशय आहे.. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्याने पाथर्डी-गवळाणे, सिन्नर परिसर, शिर्डी-ओझर पट्टा या परिसरात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे.

या संपूर्ण प्रकरणात एका बड्या शासकीय अधिकाऱ्याकडे संशयाची सुई वळलीय. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सातत्याने पडद्यामागून मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप होतोय... तसचं खरातची अटक टाळण्यासाठी वकील पुरवण्यापासून ते आर्थिक रसद पुरवण्यापर्यंत या अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय आहे.

दरम्यान खरातवर केवळ जमिनी खरेदीचेच नाही, तर गोरगरिबांच्या जमिनी हडपल्याचे आणि अवैध कब्जा केल्याचेही गंभीर आरोप आहेत. त्यामुळे या जमिनींची खरेदी नेमकी कोणाच्या पैशातून झाली? याचा तपास SIT कडून सुरु आहे... त्यामुळे अध्यात्माच्या बुरख्या आडून अचाट संपत्तीचा धनी होणाऱ्या खरातचे खरे मालक नेमके कोण आहेत ? हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT