Nashik Ashok Kharat Case 
महाराष्ट्र

Ashok Kharat: भोंदू बाबाला मदत करणारे कोण? खरात प्रकरणात SITचा तपास कुठंपर्यंत आला? IPS सातपुतेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Nashik Ashok Kharat Case: खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत तपासाची माहिती दिली. महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केल्याने आम्ही खरातवर कारवाई करू शकलो, असं सातपुते म्हणाल्या आहेत.

Bharat Jadhav

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात नव-नवीन खुलासे होत आहेत. असून या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. अशोक खरात याने आज सकाळी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत तपास कुठंपर्यंत आला आहे? खरातवर किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याची संपूर्ण माहिती दिली. पुढील ४० ते ४५ दिवसांत लैंगिक अत्याचाराच्या ८ गुन्ह्यांचा तपास करून दोषारोप पत्र दाखल केला जाणार असल्याचं आयपीएस तेजस्वी सातपुते म्हणाल्या.

भोंदू अशोक खरात हा भीती आणि धार्मिक नावाखाली महिलांची फसवणूक करत होता. सातत्यानं अंधश्रद्धा परवण्याचं काम करत होता. दैवी शक्ती आणि मारण्याची धमकी देऊन त्याने महिलांचे शोषण केल्याची माहिती सातपुते यांनी दिली. दरम्यान महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केल्याने आम्ही खरातवर कारवाई करू शकलो, असल्याचंही आयपीएस सातपुते म्हणाल्या.

खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर सोशल मीडियावर खरातचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावर बोलताना सातपुते म्हणाल्या की, पीडितांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पीडित महिलांच्या आक्षेपार्ह ४६५० लिंक आत्तापर्यंत डिलीट केल्या आहेत. अनेक सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत.

खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारनामे केल्याप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी २३ जणांचं तपास पथक तयार करण्यात आले आहे. खरातविरोधात नाशिक, नगरमध्ये १२ गुन्हे दाखल. ९ गुन्ह्याचा तपास एसआयटीकडून चालू आहे. एकूण ११ गुन्हे SIT कडे तपासासाठी आहेत. ९ गुन्ह्याचा तपास SIT, २ गुन्हे नगर आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. एसआयटीकडे असलेल्या आठ गुन्ह्यांपैकी आठ गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करावं लागतं. यामुळे पुढील ४० ते ४५ दिवसांत लैंगिक अत्याचाराच्या ८ गुन्ह्यांचा तपास करून दोषारोप पत्र दाखल केला जाणार आहे. मुख्य आरोपीसोडून खरातला कुणी मदत केलीय का? याचा देखील तपास केला जात आहे. अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात १४ दिवस पोलीस कोठडी मिळाली होती.

सध्या दुसऱ्या गुन्ह्यात ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्या पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. ED ने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. आमच्याकडे जी माहिती आहे, ती ED ला देण्यात आली आहे. यापुढे देखील ED ला जी काही मदत लागेल ती करू, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT