Dam Saam TV
महाराष्ट्र

Water Issue : नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता, आज महत्त्वाची बैठक

Jayakwadi Dam News : गोदावरी खोऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

अभिजीत सोनावणे

Chhatrapati Sambhajinagar News :

राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागात पाण्याची स्थिती भीषण आहे. पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा यांच्यात पाण्यासाठीचा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत. (Latest News Update)

गोदावरी खोऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अपुऱ्या पावसामुळे नाशिक, अहमदनगरसह मराठवाड्याची चिंता वाढली आहे. जलसंपत्ती नियमन धोरणानुसार वरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची आज बैठक पार पडणार आहे.

जलसंपत्ती नियमन धोरणानुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यास गंगापूर धरणात ८२, दारणा १०० तर पालखेड ८२ टक्के पाणीसाठा ठेवण्याची मुभा आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात फक्त ४८ टक्केच पाणीसाठा असल्याने वरच्या धरणांमधून पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात वरच्या धरणांमधून नेमकं किती पाणी जायकवाडीला गेलं? आता किती पाणी सोडायचं? याबाबत बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगरमधील धरणांमध्ये आधीच कमी पाणीसाठा असल्यानं पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास विरोध वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanguva Movie Review: दमदार अॅक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

SCROLL FOR NEXT