file photo  F
महाराष्ट्र

Nashik News : पुण्यानंतर नाशिकमध्ये गणेशोत्सवाबाबत महत्वाचा निर्णय, गणेश मंडळांना घ्यावी लागेल मोठी खबरदारी

Nashik ganesh festival update : नाशिकमध्ये प्रशासन आणि पोलिसांनी गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यानंतर नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

Vishal Gangurde

नाशिक : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रशासन आणि पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी डोळे दिपवणाऱ्या लेझर लाइट शो विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले. पुणे पोलिसांनी शहरात ६० दिवस शहरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घातली. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये प्रशासन आणि पोलिसांनी गणेशोत्सवाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

मागील वर्षी राज्यातील काही ठिकाणच्या गणेश विसर्जन मिरवुकीतील लेझर लाइट शोमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाली होती. नाशिक आणि पुण्यातूनही काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे काही प्रकरण समोर आले होते. नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिवरवणुकीतील लेझर लाइट शोमुळे ६ तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली होती. या धक्कादायक घटनेनंतर नेत्ररोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. या लेझर लाइट शोमुळे दिसेनासे झाल्यानंतर तपासणी केल्यानंतर भक्तांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुणे आणि नाशिक प्रशासन आणि पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आणि प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत नाशिकमधील गणेशोत्सवातील गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे मागील वर्षी उघड झाल्याने प्रशासन आणि पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या लेझर दिव्यांना पूर्णत: प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आलेत. गणेशोत्सव महामंडळांनी देखील लेझर शो करणार नसल्याचं मान्य केलं आहे. तसेच गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात ४ दहीहंडी संयोजकावर गुन्हा

दरम्यान, पुणे पोलिसांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यानंतर पुण्यात दहीहंडीच्या दिवशी 'लेझर बीम' आणि 'बीम लाइट'चा वापर केल्याचे आढळून आले आहे. मंडळ आणि संयोजकांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी हडपसरच्या तीन आणि सहाकरनगरमधील एका दहीहंडी संयोजकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT