Nashik Accident  Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरूच, भीषण अपघातात 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> तबरेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरूच आहे. एका विचित्र अपघातात 4 महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. (Nashik News)

अपघातानंतर गाड्यांच्या फोटोंवरुन अपघातांचा अंदाज लावला जाऊ शकतो. गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सिन्नरकडून येत असताना गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

काल झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

काल नाशिक-सिन्नर महामार्गावर तीन वाहनांचा अपघात झाला होता.एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला होता. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

पळसे गावाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर वाहनांचा वेग कमी झाल्याने पाठीमागून येणारी पुणे-नाशिक एसटी बस पुढील ३ दुचाकी आणि एसटी बसला धडकल्याने अपघात झाला आहे.या अपघातात २ दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT