Nashik Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident News: धोंड्याच्या महिन्यात माहेरी आलेल्या लेकीसह आईवर काळाचा घाला; हृदयद्रावक घटनेने नाशिक हळहळलं

Accident News: आपल्या आनंदात अशा पद्धतीने मिठाचा खडा पडेल याची कुणालाच काही कल्पना नव्हती.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik News: मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याची कुणालाच काहीच कल्पना नसते. नाशिकमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. धोंड्यासाठी माहेरी आलेल्या लेकीचा आपल्या आईसह विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या ओझरयेथील दत्तनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. धोंड्याच्या महिन्यात मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली म्हणून घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. आपल्या आनंदात अशा पद्धतीने मिठाचा खडा पडेल याची कुणालाच काही कल्पना नव्हती.

मुलीच्या माहेरी घरी टेरेसवर पेरूचे झाड आहे. पेरू खाण्याचा मोह झाल्याने ती टेरेसवर गेली होती. यावेळी पेरू तोडतांना उच्चदाबाच्या विज वाहिनी तारांना हातातील लोखंडी रॉडचा स्पर्श झाल्यानं तिला विजेचा जोरदार झटका बसला. विद्युतप्रवाह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत उतरून पाण्याची टाकी फुटल्याने पाण्याचा करंट बसून आईचा देखील मृत्यू झाला. तर मोठा आवाज एकून जावई आपल्या दोन मुलांसह टेरेसवर धावत आले, मात्र पाण्यातील करंटने त्यांना दूर फेकल्याने ते बचावले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मीना यांचा मुलगा घराकडे परतत असताना त्याचाही अपघात होऊन तो गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे ओझर शहरावर शोककळा पसरलीय. आकांशा रणशुर आणि मीना सोनवणे अशी मृत मायलेकींची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Kantara Chapter 1 OTT : 'कांतारा' चे वादळ 'ओटीटी'वर कधी येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT