Nashik ST Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Nashik ST Bus Accident: नाशिकमध्ये मोठी दुर्घटना! सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बस दरीत कोसळली; बचावकार्य सुरू

Shree Saptshrungi Gad Ghaat Bus Accident: नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nashik Bus Accident News: नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील (Nashik Bus Accident) दरीत कोसळली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १८ ते २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची बस सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाण्यासाठी निघाली होती. या बसमधून २० ते २५ प्रवासी प्रवास करीत होते. वणी गड उतरत असताना गणपती पॉईंटजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस थेट दरीत (Bus Accident) कोसळली.

या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

"वणी घाटात ST बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे. त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत.

गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्राथामिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना", अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भूसे यांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT