Nashik Accident Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident: चित्तथरारक! प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने घेतला पेट; नाशिकमधील थरारक घटना

Nashik News: रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदैरहून पुण्याला जाणा-या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर अचानक फुटला. धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट घेतला.

Ruchika Jadhav

Nashik:

नाशिकमध्ये आज पाहाटेच्या सुमारास अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदैरहून पुण्याला जाणा-या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर अचानक फुटला. धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट घेतला.

यावेळी वाहनचालकाने वेळीच बस थांबवत बसमध्ये असलेल्या ४० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र बसने पेट घेतला असल्याने बसमधील जे पार्सल होते ते बस सह जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथून अग्निशामक घटनास्थळी पोहचले.

मात्र अग्निशामकदल घटनास्थळी पोहचेपर्यंत बस जळून पूर्णता खाक झाली होती. सुदैवाने यात कुणालाही काही ईजा झाली नसली तरी बसमधील प्रवाशांच्या सामानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT