Accident News saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident : नाशिकमध्ये मोठा अपघात; भरधाव बसने २ दुचाकीस्वारांना उडवले, अपघातात एकाचा मृत्यू

नाशिकमधून अपघाताचं मोठं वृत्त समोर आलं आहे. एका बसने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिकमधून अपघाताचं मोठं वृत्त समोर आलं आहे. एका बसने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना घडली आहे. नाशिक - त्रंबकेश्वर रस्त्यावर ही प्रवासी बस उलटल्याची घटना घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात एक खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- त्रंबकेश्वर (Nashik) रस्त्यावर प्रवासी बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने फुटल्याने बस बेळगाव ढगाजवळ उलटली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांना बसने उडवले आहे. या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकूण चार जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होण्याचं नाव नाही. काल समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण अपघात झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ हा अपघात झाला. महामार्गावरून ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

शिवभक्तांच्या गाडीला अपघात

बेंगलोर-मुंबई हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात झाला. कात्रज देहूरोड बायपासच्या ताथवडे येथे एका टेम्पोचा अपघात झाला . कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात अनेक शिवभक्त जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा मतचोरीचा बॉम्ब, १०० टक्के पुरावे असल्याचेही सांगितले

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT