Narhari zirwal Viral VIDEO  Saam tv
महाराष्ट्र

नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणात ट्विस्ट, तृतीयपंथी थेट पोलिसांत पोहचली अन् दिली तक्रार, वाचा अपडेट

Narhari zirwal VIDEO : नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण मिळाले असून संबंधित तृतीयपंथीय व्यक्तीने भावाविरोधात ब्लॅकमेलची तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांनी IT Act आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Narhari Zirwal video case : विधानसभेचे उपाध्यक्ष, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या भावाविरुद्धच मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भावाविरोधात त्यांनी 'ब्लॅकमेल'चा आरोप केला आहे.

भावाने तिला ब्लॅकमेल केले आणि मूळ व्हिडिओ जाणीवपूर्वक 'एडिट' करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तक्रारदार व्यक्तीने पोलिसांत केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी BNS कलम ७९, ३५१(१) आणि IT Act नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गोपनीयतेचा भंग आणि बदनामी केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

नरहरी झिरवाळ यांनी हा व्हिडिओ बनावट असून अनेक क्लिप्स जोडून तो तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कायदेशीर पावले उचलली आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, व्हिडिओचे मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. या नव्या वळणामुळे झिरवाळ यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT