narayan rane 
महाराष्ट्र

नागरिक सांगतील तेथेच तळीयेकरांचे पुनर्वसन करु : नारायण राणे

Siddharth Latkar

रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय लघु उद्याेग मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे मुंबईहून रवाना झाले हाेते. हे तिघे महाड येथील पूरग्रस्त तळीयेत दाखल झाले आहेत. (narayna-rane-devendra-fadnavis-praveen-darekar-visit-kokan-sml80)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणच्या दाै-यावर आहेत. त्यानंतर ते रत्नागिरी दाै-यावर जाणार आहेत. आज राणे दाै-यावर येत आहेत. ते काेणती मदत अथवा घाेषणा करणार हे पहावे लागेल.

या दाै-याविषयी राणे narayan rane यांनी ट्विट केले आहेत. ते लिहितात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.

तळीये येथे पाहणी दाै-या वेळीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दुर्घटनाग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल. प्रधानमंत्री आवास याेजनेतून आणि आप्तकालीन निधीतून घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार निधी देईल. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वतः नाराण राणे यांना पाहणीसाठी पाठविले आहे. या पाहणी दाै-यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला जाईल.

प्रवीण दरेकर हे सर्वांत आधी पाेहचले. एक जागृत लाेकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे. सध्या नागरिकांना मदतीची गरज आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ, पाेलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे ही आत्ताची वेळ आहे. टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही असेही माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी नमूद केले.रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला भेट देऊन पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आज येथील लोकांना आश्वस्त केले.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्यांची माणसं गेली त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. फार माेठ्या प्रमाणात जिवित हानी झाली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा ही वसाहत बांधतील असे आश्वासित केले. याबराेबरच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल असे येथील लोकांना आश्वासन दिले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील काेकण दाै-यावर येणार आहेत. दरम्यान हे संकट मानवनिर्मीत ठरले आहे असा आराेप चिपळूणच्या स्थानिकांकडून हाेत आहे. प्रशासनाने आम्हांला कल्पना दिली असती तर आम्ही दुकानातील साहित्य हलवले असते. त्यामुळे व्यावसायिकांना मदत द्या, दिलासा द्या, केवळ दाैरा नकाे अशी साद घातली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT