wai, satara, farmer saam tv
महाराष्ट्र

Satara News : कर्जास कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाला माेठा धक्का बसला.

ओंकार कदम

Satara Breaking Marathi News : सातारा (satara) जिल्ह्यातील वाई (wai) तालुक्यांमध्ये लोहारे या गावातील नारायण गणपत संकपाळ (narayan sankpal) या शेतकऱ्याने (famer) कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शेतक-याच्या कुटुंबाला माेठा धक्का बसला आहे. (Maharashtra News)

या घटनेबद्दल मिळालेली प्राथमिक माहिती अशी : संकपाळ यांनी गावातील विविध सोसायटीमध्ये व पतसंस्थांमधून जवळजवळ तीन लाख रुपयांचे कर्ज (loan) घेतले होते. दोन वर्षांपूर्वी एका साखर कारखान्यास घातलेल्या उसाचे बिल (sugarcane bill) न मिळाल्याने संकपाळ हे चिंतेत होते.

त्याचबरोबर त्यांनी शेतीसाठी ही कर्ज घेतलं होतं. तसेच त्यांच्या मुलाला मिलिटरी भरती करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने त्यांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केली होती. कर्जबाजारी झाल्याने अखेर संकपाळ यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT