Narayan Rane saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Narayan Rane : सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना एकत्र वाटत आहे. पण त्यांनी लोकांसाठी काय केलं? असा सवाल नारायण राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना केलाय.

Bharat Jadhav

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणं भाजपला रुचलं नाहीये. भाजपचे खासदार उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा जशा जोर धरत आहेत, त्याच वेगाने त्यांच्यावर टीका होतेय.

यापूर्वीचे बाळासाहेबांचे कट्ट्रर शिवसैनिक आणि आताचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी थेट भाष्य केलंय. यावेळी त्यांनी राज ठाकरेवरही टीका केलीय. "हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? फक्त यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत," असे नारायण राणे म्हणालेत. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीत नारायण राणेंना तुम्ही जर बाळासाहेबांना दैवत मानता, तर दोन भाऊ एकत्र येण्याचा तुम्हालाही आनंद वाटायला हवा? असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावरून राणेंनी उपरोधिकपणे उत्तर दिलं. "केवढा आनंद होतोय, मी शब्दात सांगू शकत नाही. आनंद म्हणजे काय? अशक्य गोष्ट शक्य झाली, बाकी काही नाही झालं. एकत्र येतील तेव्हा आणि एकत्र येऊ दे नांदू देना. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका. आता मुंबईत किती टक्के मराठी राहिलेत? किती मराठी लोकं ठेवलीत? मराठी माणसाठी जन्माला आलेली शिवसेना आज काय स्थिती आहे?" असे प्रश्नही त्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT