सिंधूदूर्ग : रविवारपासून गायब असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंवर (nitesh rane) यांच्यावर ३०७ कलम लावल्याची खंत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (narayan rane) आज (मंगळवार) झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. गेल्या तीन दिवसांपासून पाेलिसांनी लपवून ठेवलेली माहिती खूद्द राणेंनीच सांगितली आहे.
राणेंच्या सांगण्यानूसार ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असेल तर हे कलम अजामीनपात्र आहे. हा दखलपात्र गुन्हा समजला जाताे. त्यामुळेच बहुधा आमदार नितेश राणे हे गायब झाले असावेत आणि त्यांनी अटकपुर्वसाठी अर्ज केला असावा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान पाेलिसांनी अद्याप आमदार नितेश राणेंवर काेणत्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे याची माहिती माध्यमांना दिलेली नाही.
सिंधूदूर्ग (sindhudurg) जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन शिवसेनेचे (shivsena) संतोप परब यांच्यावर नुकताच हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी या हल्ल्यात आमदार नितेश राणे (nitesh rane) आणि गाेट्या सावंत हे सूत्रधार असल्याचे म्हटलं. त्यानंतर पाेलिसांत तशी तक्रार करण्यात आली. या प्रकरणी पाेलिसांनी आमदार नितेश राणेंना चाैकशीसाठी बाेलावले हाेते. त्यांची चाैकशी झाल्याच्या दिवसापासून आमदार नितेश राणे हे गायब झाले आहेत.
गेल्या दाेन दिवसांत काेकणातले विशेषतः सिंधूदूर्ग जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना आमदार नितेश राणेंच्या अटकेसाठी आक्रमक झालेली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या अटकेची मागणी करण्यासाठी पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढण्यात आला. दूसरीकडे आमदार नितेश राणेंना धाेक्याची घंटा जाणविल्याने त्यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
त्याची सुनावणी आज (मंगळवार) दुपारच्या सत्रात न्यायालयात हाेईल. दरम्यान या प्रकरणी सहा संशयित आराेपींना अटक केली आहे अशी माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली. परंतु नितेश राणेंबाबत पाेलिसांनी काहीच माहिती दिली नाही.
edited by : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.