नारायण राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रवाना  Saam Tv
महाराष्ट्र

नारायण राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री Union Minister नारायण राणे Narayan Rane यांना चांगलेच भोवले आहे. नाशिकमध्ये Nashik नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत Police नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

नारायण राणें यांच्या विरोधामध्ये कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंवर नाशिक, महाड येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राणेंच्या विधानाने समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत 'मी असतो तर कानाखाली चढवली असती', असे आक्षेपार्ह वक्तव्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

हे देखील पहा-

या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक Arrested करण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.

जनआशिर्वाद यात्रा निमित्त नारायण राणे आज चिपळूनमध्ये आहेत. याठिकाणी नाशिक पोलिसांची टीम पोहचल्यावर त्यांना अटक करणार असल्याचे समजत आहे. या सर्व घटनामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो, तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती.

यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे त्यांना ज्ञान नाही. आपल्याला माहीत नसेल, तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन, गद्दारी करत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली होती. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा सुरू

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT