Narayan Rane 
महाराष्ट्र

राणेंची चुप्पी; माध्यमांकडे कटाक्षही टाकला नाही

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीस दिल्लीला जाण्यासाठी आज (साेमवार) केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यातून बाहेर पडले. जन आशीर्वाद यात्रेची सांगता करताना आणि त्यापुर्वी देखील राणेंनी माध्यमांना आता मी सावध पावलं टाकणार असल्याचे सांगितले हाेते. त्याची कृतीच जणू त्यांनी आज बंगल्याच्या बाहेर पडल्यानंतर करुन दाखवली. त्यांनी माध्यमांशी बाेलणे टाळले. माध्यम प्रतिनिधींकडून राणेंनी Narayan Rane ढुकुंन देखील पाहिले नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज महाड न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे शाखेत हजर राहणे अपेक्षीत हाेते. त्यांच्या वकीलांनी राणेंच्यावतीने त्यांचे म्हणणे गुन्हे शाखेत जाऊन मांडले. आज मंत्री राणे दुपारी तीन वाजता गाेवा येथून दिल्ली जाणार आहेत. त्यासाठी ते नुकतेच कणकवली येथून रवाना झाले.

दरम्यान अटक सत्रानंतरच्या घडामाेडी नंतर मंत्री राणे यांनी मी जेव्हा बाेलायचे तेव्हा बाेलणार, मी आता सावध पावलं टाकणार असल्याचे माध्यमातून वारंवार सांगत आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या सांगता करताना देखील झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी काय बाेलायचे कूठ बाेलायचे हे मी ठरवीन असे म्हणत अधिक बाेलणे टाळणे पसंत केल्याचे स्पष्ट केले.

आज महाड येथे ते का गेले नाहीत याची विचारणा करण्यासाठी अथवा अन्य काही बाबींसाठी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची बंगल्याबाहेर वाट पहात हाेते. मंत्री राणे बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर थेट वाहनाकडे गेले. त्यांनी कुणाकडे कटाक्षही टाकला नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT