Narayan Rane Criticism Uddhav Thackeray Saam Tv News
महाराष्ट्र

फक्त मासे-मटण खाण्यासाठी कोकणात येतात, ते आले कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचं; राणेंचा ठाकरेंना टोला

Narayan Rane Criticism Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे', असे आदेश खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिले आहेत.

Prashant Patil

सिंधुदुर्ग : 'उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे', असे आदेश खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिले आहेत. 'मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले?' असा सवाल राणेंनी केला. 'केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतात. त्यामुळेच ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे' असं मी हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे म्हणाले. ते आज सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

'चिपी विमानतळावरुन आता इंडिगो विमान पण येणार आहे. आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत यासाठी माझा प्रयत्न' असल्याचं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं. 'मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या ६० फूट उंच पुतळ्याचं १ मे रोजी अनावरण होईल अशा प्रकारे नियोजन करुन काम सुरू झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ६० टक्के काम झाल्याची माहिती मिळाल्याचं' राणे म्हणाले.

'उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दिलं नाही. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पाहा', असंही नारायण राणे म्हणाले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती पैसे दिले? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. 'त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही', असं नारायण राणे म्हणाले. 'ते ज्या दिवशी येतील त्या दिवशी कोंबडी, मासे आणि वडे बंद ठेवा', असा आदेश नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिला आहे. 'चिपी विमानतळ कधीही बंद पडणार नाही. देशातील सगळ्या ठिकाणी विमाने आता जाणार असल्याचं नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं. 'पण लोकांनी विविध ठिकाणी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत म्हणजे उत्पन्न वाढेल', असा सल्ला देखील नारायण राणे यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT