Santosh Bangar : रुग्णाला अमृत पाजलंय का? गोरगरिबाला लुटू नका, डेंग्यूच्या रुग्णाला ६ लाखांचं बिल; संतोष बांगर भडकले

Santosh Bangar Audio Call : हिंगोली जिल्ह्यातील आदिती सरकटे यांच्यावर डेंग्यू झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांना एकूण ६ लाखांचं बिल देण्यात आलं.
Santosh Bangar
Santosh BangarSaam Tv News
Published On

हिंगोली : डेंग्यू झालेल्या रुग्णाला ६ लाखांचं बिल पाठवलंय, त्याला काय अमृत पाजलं का? असा शब्दात शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी डॉक्टरांना चांगलंच फैलावर घेतलं. रुग्णाची परिस्थिती कशीही असो, पण ६ लाखांचं बिल देऊन त्यांना लुटू नका, असंही ते म्हणाले. या प्रकरणाबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. 'साम टीव्ही' या व्हायरल ऑडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी करत नाही.

हिंगोली जिल्ह्यातील आदिती सरकटे यांच्यावर डेंग्यू झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांना एकूण ६ लाखांचं बिल देण्यात आलं. डेंग्यूच्या रुग्णाला एवढं बिल कसं काय? असा प्रश्न करत संतोष बांगर यांनी डॉक्टरांना चांगलंच झापलं. ६ लाखांचं बिल केलं, तुम्ही रुग्णाला काय अमृत पाजलं का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

डॉक्टरांशी फोनवर बोलताना संतोष बांगर म्हणाले की, 'रुग्णाला ३ लाखांचं मेडिकल बिल आणि दोन लाख ८५ हजारांची फी लावण्यात आली आहे. त्यांनी १ लाख ८० हजारांचं बिल भरलंय. डेंग्यूच्या रुग्णाला एवढं बिल लावतात का? त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, 'रुग्ण भरती झाला त्यावेळी गंभीर होता. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यामुळेच एवढं बिल झालं'. 'त्यावर आपला भाऊ एमबीबीएस एमडी आहे, तुम्ही खोटं बोलू नका', असं आमदार संतोष बांगर डॉक्टरांना म्हणाले.

'एवढं मोठं हॉस्पिटल लोकांना लुटण्यासाठी बांधलंय का?' असा प्रश्न संतोष बांगर यांनी विचारला. 'गोरगरिबाला लुटू नका, हात जोडून तुम्हाला विनंती करतो. या पद्धतीने जर तुम्ही दवाखाना चालवणार असाल तर आम्हालाही अॅक्शन घेण्याचा अधिकार आहे', असा इशाराही संतोष बांगर यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com