narayan rane ajit pawar 
महाराष्ट्र

मी हे खपवून घेणार नाही; नारायण राणेंचा पाेलिसांना इशारा

पोलीस अधिकाराचा गैरवापर करून नितेश राणे व गोटा सावंत यांना चौकशीसाठी बोलवून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्कल लागते असं म्हणाले आहेत. त्यांनीच भ्रष्टाचार केला आहे. संचयनी सारख्या गोष्टीत भ्रष्टाचार केला. त्यामुळे कारभार करण्यासाठी अक्कल लागते असा उपरोधिक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी अकलेचे काय तारे तोडलेत हे जनतेला आता कळून चुकले आहे असेही राणे यांनी अजित पवार यांना उद्देशन म्हटलं आहे. कुडाळ येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बाेलत हाेते.

सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील चार नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची (bjp) सत्ता येथे हे लक्षात आल्यानंतर सूड भावनेने आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप नारायण राणे (narayan rane) यांनी केला आहे. कणकवलीत (kankavali) मारहाणीची घटना घडली. त्या घटनेमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) व गोटया सावंत यांचा संबंध लावून पोलीस अधिकाराचा गैरवापर करून नितेश राणे व गोटा सावंत यांना चौकशीसाठी बोलवून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे बळाचा व अधिकाराचा गैरवापर करून नाहक आमदार नितेश राणे यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी लक्षात ठेवावे केंद्रामध्ये पण आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलीस वागत असतील तर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. पोलिसांनी (police) अधिकाराचा गैरवापर करू नये असा सूचक इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: वसई- विरारमध्ये पावसाचा कहर, रस्ते पाण्याखाली

Sangali Accident : सांगलीत एसटी बस आणि कंटेनरची भीषण धडक; देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांचा अपघात

Godavari River Flood : गोदावरी नदीला पूर; गंगामसला गावात पुराचे पाणी, मोरेश्वर मंदिर पाण्याखाली

Goa Vibes Mumbai : मुंबईत गोवा! गोराई बीचवर पांढरी वाळू, सीफूड आणि फेरी राइड One Day Tripचा अनुभव

सोन्याच्या भावाला चकाकी! १० तोळं सोनं ४,३०० रूपयांनी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT