Corona 
महाराष्ट्र

पोटनिवडणुकीच्या धामधुमीत कोरोनाचा विसर; नो मास्क, नो एंट्री केवळ नावालाच

पोटनिवडणुकीच्या धामधुमीत कोरोनाचा विसर; नो मास्क, नो एंट्री केवळ नावालाच

साम टिव्ही ब्युरो

चंद्रकांत चव्हाण

अक्कलकुवा (नंदुरबार) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची धामधुम सुरू आहे. या धामधुमीत इच्छुंकांसह कार्यकर्त्यांनाही कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. एकाचाही तोंडावर मास्क नाही किंवा फिजिकल डिस्टन्सचा नियमांचे पालन करतांना दिसून आले नाही. ज्यांचेकडे मास्क आहे. तो केवळ हनुवटीवर लावलेला तर काहींनी गळ्यात हातरूमाल बांधलेला होता. त्यामुळे ही निवडणूक कोरोनाला तर निमंत्रण देणार नाही ना? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. शासकिय कार्यालये व नेत्यांच्‍या बंगल्यांच्‍या प्रवेशद्वारावर असलेले नो मास्क, नो एन्ट्रीचे फलक कुचकामी ठरले आहे. (nandurbar-zilha-parishad-election-corona-rules-not-follow-people-crowd)

अक्कलकुवा व खापर जिल्हा परिषद गट, तर पंचायत समितीच्या कोराई गणासाठी पोट निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या धामधुमीत मात्र सर्वच राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना आणि प्रशासनालाही कोरोनाचा पद्धतशीर पणे विसर पडल्याचे दिसुन येत आहे. दोन गट व एक गण या रिक्त जागांसाठी तालुक्यात निवडणुकीची प्रक्रिया अक्कलकुवा तहसिल कार्यालयात सुरु आहे. अर्ज सादर करण्यासाठी ५ जुलै अंतिम मुदत होती. तत्त्पूर्वी इच्छुकांची कादगपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी तहसिल परिसरात गर्दी सुरू होती. तसेच इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयाच्या परिसरात सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांसहीत कार्यकर्त्यांचा वावर वाढला आहे. या वातावरणात मात्र सर्वच राजकिय पक्ष व त्यांच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना कोरोनाचा पद्धतशीरपणे विसर पडल्याचे चित्र दिसुन येत आहे.

कोरोनाला नव्‍हे नियमांना केले हद्दपार

इच्छूक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत फिजिकल डिस्टन्स नावाचा प्रकार हद्दपार झाल्याचेच चित्र आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नावाचा प्रकार नाही. ज्यांच्याकडे मास्क असतात ते एक तर हनवटीवर ठेवलेले आढळतात किंवा हात रुमाल टू इन वन वापरासाठी उपयोगात आणतांना दिसतात. विशेष म्हणजे तहसील आणि पोलिस स्टेशनच्या परिसरात होणाऱ्या या गर्दीची चिंता कोणालाच नसल्याचे दिसून येते.

गर्दीवर हवे नियंत्रण

तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या परिसरात होणाऱ्या या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची स्थिती दिसुन येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अक्कलकुवा तालुक्यात कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले होते. त्यामुळे प्रशासन व नागरिक हतबल झालेले होते. शासकीय आकडेवारीपेक्षा तालुक्यातील स्थिती अत्यंत गंभीर होती. दुसऱ्या लाटेत तालुक्यातील अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा पोहचली होती. असे असतांना देखील निवडणुकीच्या निमित्ताने मात्र सर्वांनाच कोरोनाचा विसर पडला की काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतोय.

तिसरी लाटेला निमंत्रण

सध्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तसेच डेल्टा व्हेरियंट या बदललेल्या घातक विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी राज्यात कडक निर्बंधांसहीत नियमावली लागू करण्यात आली आहे. असे असताना गर्दी होऊच लागली आहे. येणाऱ्या काळात खबरदारी घेतली गेली नाही; तर निवडणुक प्रक्रिया, छोटेखानी सभा, मेळावे होम टू होम संपर्क यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याचे नवल वाटायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT