दोन दशकानंतर जुलैत तापमान चाळीशी पार; जाणवतोय ‘मे हीट’चा तडाखा

दोन दशकानंतर जुलैत तापमान चाळीशी पार; जाणवतोय ‘मे हीट’चा तडाखा
temperature
temperature
Published On

जळगाव : केवळ येण्याची वर्दी देऊन गायब झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने चिंता वाढवलेली असताना आता ऐन जुलैत नागरिकांना ‘मे हीट’च्या चटक्याचा अनुभव येतो. जिल्ह्यात तापमानाने चाळीशी पार केली असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना घामाच्या धारांनी हैराण केल्याचे चित्र दिसतेय. (jalgaon-news-After-two-decades-the-temperature-in-July-crossed-40-degrees)

यंदा राज्यात मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली. ज्या धडाक्यात मॉन्सूनचा पाऊस आला; तो पाहता पावसाळा सुसह्य जाईल, असे चित्र होते. जळगाव जिल्ह्यात मात्र मॉन्सूनने केवळ वर्दी देऊन पलायन केले. तुरळक स्वरुपाचा पाऊस तेवढा झाला. मात्र दोन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट उभे केले असून शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

temperature
सराफ दुकानात भरदिवसा दरोडा; डोक्‍यावर बंदूक ठेवले दागिने लंपास

तापमानाचा पारा वाढला

एकीकडे दुबार पेरणीचे संकट आणि दुसरीकडे पाणीटंचाईचे सावटही जिल्ह्यावर आहे. ऐन जुलैत प्रकल्पांमधील साठा कमी होऊन टँकरची संख्या ५ वरुन ८ झालेली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची काहिली होत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच जुलै महिन्यात कमाल तापमानाने ४० चा आकडा पार केल्याची नोंद नुकतीच झाली. ‘मे हीट’चा तडाखा या उन्हाने जाणवत असून वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा वाढून घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

कुलर, एसी सुरुच

जून महिन्यात दोन- तीन वेळा पावसाने हजेरी लावल्यानंतर एसी, कुलरचा वापर कमी होतो. यंदा मात्र एसी, कुलरचा वापर कमी झालेलाच नाही. उलटपक्षी ऐन जुलैत या उपकरणांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. अगदी दुपारी ११ वाजेपासूनच कुलर सुरु होत असून रात्री तापमानाचा पारा घसरत असला तरी उकाडा कायम असल्याने कुलर, एसी सुरुच असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com