Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

Snake Bite : १५ दिवसात सर्पदंशाने तीन शेतकऱ्यांचा मृत्यू; तळोदा तालुक्यातील घटना

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसानंतर काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून परिसरात दमट वातावरण तयार झाले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पावसाळ्याच्या दिवसात साप बाहेर येत असतात. या काळात शेतात काम करत असताना किंवा अडगडीच्या ठिकाणी बसलेले साप दंश करत असतात. प्रामुख्याने पावसाळ्यात अशा घटना अधिक घडत असतात. दरम्यान नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात मागील पंधरा दिवसात सर्पदंश होऊन तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  

तळोदा (Taloda) तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसानंतर काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून परिसरात दमट वातावरण तयार झाले आहे. या दमट वातावरणामुळे विषारी साप बाहेर यायला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात जमिनीखाली पाणी गेल्याने अन्नाचा शोधात साप बाहेर पडत असतात. बऱ्याचदा साप घराच्या आवारात, झाडावर देखील येत असतात. इतकेच नाही तर कौलारू घर किंवा पत्राचे शेड टाकलेल्या घराच्या छतावर देखील साप जात असतात. यामुळे या काळात अशा प्रकारे दबा धरून बसलेले साप दंश (Snake Bite) करत असल्याच्या घटना वाढत असतात. 

तीन शेतकऱ्यांचा मृत्यू 

शेतकरी (Farmer) हा आपल्या दैनंदिन कामात असल्यामुळे शेतात काम करताना सर्पदंशांचा घटनांमध्ये वाढ झाली असून गेल्या १५ दिवसात तीन शेतकऱ्यांचा सर्प दंशाने मृत्यू झालेला आहे. सर्पदंशाचे मृत्यू होण्याचा दुर्घटना टाळण्यासाठी निसर्गप्रेमींकडून सर्पदंश प्रथमोपचार आणि संदर्भसेवा याबाबत जनजागृती मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT