Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : घरासमोर खेळणाऱ्या बालकावर बिबट्याचा हल्ला; नागरिकांनी धाव घेतल्याने सुदैवाने वाचले प्राण

Nandurbar News : सातपुडा पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यात प्रामुख्याने बिबट्या वस्तीत येत असून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बिबट्यावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा जीव गेला आहे. यानंतर घरासमोर खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना तळोदा तालुक्यात घडली. 

सातपुडा पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यात प्रामुख्याने बिबट्या वस्तीत येत असून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी तळोदा तालुक्यात शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला केला होता. यात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. हि घटना ताजी असतानाच तळोदा शहराला लागून गुजरातच्या आमोदा गावात घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. 

दरम्यान या चार वर्षाच्या बालकावर हल्ला केला असता बालक जिवाच्या आकांताने ओरडला. बालकाला बिबट्याने पंज्यात पकडल्याचे मुलामागून जाणाऱ्या मुलाच्या आईच्या व एका गावकर्यांच्या लक्षात आले. यानंतर त्या गावकऱ्यांनी हातातील लाकडी मुसळ बिबट्याच्या तोंडावर मारून बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडवत प्राण वाचविले. यानंतर गंभीर जखमी बालकाला उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल केल असून बालकाची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती मिळाली आहे.

बिबट्या लागलीच जेरबंद 

घटना घडली यावेळी आजूबाजूच्या लोकांनी वेळीच धाव घेऊन बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. तर परिसरात नरभक्षक बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. याची दखल घेत लगेच गुजरात वनविभागाने त्या भागात पिंजरा लावला. दुसऱ्याच दिवशी हल्लेखोर बिबट्या जेरबंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT