Nandurbar Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Rain : संततधार पावसामुळे घर कोसळले; कुटुंबातील चार सदस्य जखमी, दोन गाई दगावल्या

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट गावात एक घर कोसळले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील दोन- तीन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यासह सातपुड्याचा परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील लक्कडकोट गावात एक घर कोसळल्याची घटना घडली. यात कुटुंबातील चौघे जखमी झाले आहेत. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यासह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तळोदा (Taloda) तालुक्यातील लक्कडकोट गावात एक घर कोसळले. घर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जागल्या फुल्या पाडवी यांचे घर संततधार पावसामुळे कोसळले असून यात परिवारातील जागत्या पाडवी, बाजू पाडवी, पवन पाडवी, लवीबाई पाडवी ये चार जण जखमी झाले आहे. या घटनेत जखमी झालेल्या चौघांवर तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दोन गायींचा मृत्यू 

दरम्यान घर कोसळले त्याच्या बाजूला जनावरे देखील बांधलेली होती. यामध्ये घराच्या भिंडीखाली दाबल्या गेल्याने दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. (Rain) सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी मदतकार्य राबविण्यात आले. तर महसूल विभागाला याची माहिती देण्यात आली असून महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT