Taloda News Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : सातबारा उताऱ्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्‍या ताब्‍यात

सातबारा उताऱ्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

तळोदा (नंदुरबार) : सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या कामासाठी तसेच नवीन नावाचा सातबारा उताऱ्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात तळोदा (Taloda) तालुक्यातील अंमलपाडा येथील लोकसेवक तलाठीला ३ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहात पकडले. नंदलाल प्रभाकर ठाकूर असे या तलाठीचे नाव आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

तळोदा तालुक्यातील अंमलपाडा येथील गाव नमुना सातबारा महसूल अभिलेखावर तक्रारदाराचे नाव नोंद करून दिले आहे. तक्रारदार यांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावून द्यायचे आहे. तसेच करून दिलेल्या कामाबाबत तसेच नवीन नावाचा सातबारा उताऱ्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक तलाठी नंदलाल ठाकूर यांनी २६ जूनला तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तीन हजार स्‍वीकारताना ताब्‍यात

तडजोडीअंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्‍यानुसार सोमवारी (३ जून) ३ हजार रुपयांची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष लाच स्वीकारताना तलाठी नंदलाल ठाकूरला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, लाच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT