Nandurbar Accident Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar Accident : साखरेने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; वाहन चालकाचा जागीच मृत्यू

Accident News: घाटात तीव्र उतार असल्याने ट्रक रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटक गेला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. ट्रकमधील साखरेचा गोण्या देखील महामार्गावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्यात.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे

Nandurbar Sugar Truck Accident:

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात साखरेने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला आढळल्याने मोठा अपघात झाला आहे. घाटात तीव्र उतार असल्याने ट्रक रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटक गेला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. ट्रकमधील साखरेचा गोण्या देखील महामार्गावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्यात.

विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजेच्या धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जाणारा ट्रक अनियंत्रित झाला. अपघात झाल्याने लागलीच घटनास्थळी विसरवाडी पोलीस महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि या ठिकाणी मदत कार्य केले.

ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपाययोजना करत आहे. घटनास्थळी 108 रुग्णवाहिकेला पोलिसांनी प्राचारण केले आहे. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटातील वाढते अपघात चिंतेच्या विषय बनला आहे.

मिनी बस आणि ट्रकमध्ये धडक, ४ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर

अमरावतीमध्ये देखील आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडलीये. सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण जखमी झाले आहेत. अमरावतीतील नांदगाव-खंडेश्वर रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व मुलं बसने क्रिकेट खेळायला निघाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT