Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा घात झाला; आमदारी पॉईंटवरून पडून मृत्यू

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ पर्यटनस्थळावर आमदारी पॉईंटवरून खाली पडल्याने तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान हा अपघात होता की घातपात हे समोर आलेले नाही.

Alisha Khedekar

  • नंदुरबारच्या तोरणमाळ पर्यटनस्थळावर आमदारी पॉईंटवरून पडल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

  • मृत अधिकाऱ्याचे नाव शुभम जगताप असे आहे.

  • मृत अधिकारी बुलढाण्याचे रहिवासी होते

  • तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ पर्यटनस्थळ पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेमुळे चर्चेत आले आहे. येथे आमदारी पॉईंटवरून खाली पडल्याने एका तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव शुभम जगताप असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम जगताप हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी होते. जगताप हे तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात गेल्या एका वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. नंदुरबार मधील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून येथे पर्यटक मोठ्याप्रमाणावर फिरण्यासाठी येतात. तसेच स्थानिक नागरिकांची देखील येथे रेलचेल असते. जगताप हे देखील तोरणमाळ येथे फिरण्यासाठी गेले होते.

या दरम्यान जगताप यांचा आमदारी पॉईंटवरून थेट दरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने मृत देह बाहेर काढला असून तो राणीपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला आहे. घडलेल्या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मात्र जगताप हे दरीत पडले की हा घातपात होता हे अद्यापही समोर आलेलं नाही. शुभम जगताप या वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत नेमकं काय घडलं ? हे अद्यापही अनुत्तरित आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपलं असून गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT