Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan: जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांचे अन्नत्याग; राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी

Nandurbar News : जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांचे अन्नत्याग; राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील या आंदोलनाची धग पोहचली आहे. यात आता आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहादा (Shahada) तालुक्यातील पिंपर्दे ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. (Live Marathi News)

मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) आंदोलनाची धग नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यातही पोहोचली आहे. जिल्ह्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावातील मराठा तरुणांनी राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले असून गावातील मराठा समाजातील नागरिकांनी गावातील चौकात बसत एक दिवशी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात वाढतेय आंदोलनाची तीव्रता 

त्यासोबत गावात येण्यास राजकीय पक्षाच्या नेत्यांना बंदी घालण्यात आली असून आता नंदुरबार सारख्या दुर्गम भागात गाव खेड्यांमध्ये ही मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आंदोलनाचाही प्रभाव आता दिसून येत असून आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने ही उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: NCERT च्या विरोधात साताऱ्यात एल्गार, छत्रपती घराण्याच्या वतीने काढण्यात आला मोर्चा

Health Care: जेवणाआधी पाणी पिणे की जेवणानंतर? चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

SCROLL FOR NEXT