Shahada Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shahada Crime News : नृत्याच्या वादातून तरुणाचा खून; शहादा तालुक्यातील घटना

Nandurbar News : वार छातीत खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले.

साम टिव्ही ब्युरो

म्हसावद (नंदुरबार) : शहादा तालुक्यातील सुलवाडे येथे होळीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात गेर नृत्याचा कार्यक्रम (Nandurbar) आयोजित केला होता. या नृत्याच्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

शहादा (Shahada) तालुक्यातील सुलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होळी उत्सवानिमित्त गेर नृत्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी सोमनाथ गेंडल सोनवणे (वय २७, रा. बिलाडी-बामखेडा) हा तरुण होळी उत्सवात परंपरागत गेर नर्तक बनून हातात चाकू घेऊन नृत्य करत होता. नृत्य करताना सुकलाल रघुनाथ पवार (वय २७) यास त्याचा धक्का लागला. सुकलालने त्यास ‘तू धक्का का मारला’ असे विचारले (Crime News) असता त्याचा राग येऊन सोमनाथने सुकलालच्या छातीवर चाकूने वार केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वार छातीत खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र नंदुरबारला जात असतानाच लहान शहाद्याजवळ त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT