Nandurbar Satpuda News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : BA पास तरुण करायचा महिलांची प्रसूती, बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; असा अडकला जाळ्यात

Nandurbar Satpuda News : नंदुरबारच्या सातपुडा भागात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश. बीए पास तरुणाने ५ वर्षे दवाखाना चालवत आदिवासींची फसवणूक केली. गर्भवती महिलांवर उपचार केल्याचा संशय, प्रशासनावर गंभीर प्रश्न.

Alisha Khedekar

  • नंदुरबारमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

  • बीए पास तरुण ५ वर्षे दवाखाना चालवत होता

  • गर्भवती महिलांवर उपचार व प्रसूती केल्याचा संशय

  • आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

  • प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका

सागर निकवडे, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धडगाव तालुक्यातील वावी गावात चक्क एक बीए पास तरुण डॉक्टर बनून आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी जनजागृती टीमचे राकेश पावरा यांनी या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उद्भवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधून आलेला 'बीवस बाला' नावाचा हा भामटा गेल्या पाच वर्षांपासून वावी आणि परिसरातील दुर्गम पाड्यांवर बेधडकपणे दवाखाना चालवत होता. आरोग्याची कोणतीही पदवी किंवा रीतसर परवाना नसताना त्याने इथे आपला जम बसवला होता. स्थानिक आदिवासी बांधव उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर याच्याकडे येत होते, ज्याचा फायदा घेत त्याने मोठी फसवणूक सुरू ठेवली होती.

प्रसूती करत असल्याचा दाट संशय

आदिवासी जनजागृती टीमने जेव्हा या बोगस दवाखान्यावर धाड टाकली, तेव्हा तिथले दृश्य पाहून सर्वांचेच धाबे दणाणले. या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर प्रेग्नेंसी किट्सचा खच आणि वापरलेल्या सलाईनच्या बाटल्यांचा ढीग आढळला. आरोग्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना हा बोगस डॉक्टर चक्क गर्भवती महिलांची प्रसूती करत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. जर हे सत्य असेल, तर दुर्गम भागातील माता आणि बालमृत्यूच्या घटनांना असे बोगस डॉक्टरच जबाबदार असल्याचे अधोरेखित होत आहे.

बोगस डॉक्टर बीए पास

राकेश पावरा आणि त्यांच्या टीमने जेव्हा या भामट्याला गाठून त्याच्या पदवीबाबत विचारणा केली, तेव्हा सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर कॅमेऱ्यासमोर त्याने आपण केवळ बीए उत्तीर्ण असल्याची कबुली दिली. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हजारो लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या व्यक्तीवर आता कठोर कारवाईची मागणी होत आहे.

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

एकीकडे सरकार आरोग्य सेवा घराघरात पोहोचल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या नाकाखाली पाच वर्षे हा गोरखधंदा सुरू कसा होता? असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे. दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था आणि डॉक्टरांची कमतरता यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचे फावते आहे का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ, सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

क्रिकेटच्या मैदानात राडा घालणारा श्रेयस अय्यर आहे जादूगार! 52 पत्त्यामधून नेमका काढला बदामचा एक्का, व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

SCROLL FOR NEXT