खाकीतला 'बापमाणूस'; 10 वर्षीय बालिकेचा उचलला आर्थिक खर्च
खाकीतला 'बापमाणूस'; 10 वर्षीय बालिकेचा उचलला आर्थिक खर्च Saam TV
महाराष्ट्र

खाकीतला 'बापमाणूस'; 10 वर्षीय बालिकेचा उचलला आर्थिक खर्च

दिनू गावित

नंदुरबार: गेल्या आठवड्यात नंदुरबार शहरातील वाघेश्वरी टेकडी परिसरात वास्तव्यास असलेली दहा वर्षीय बालिका संगीता राजू वळवी दूध घेण्यासाठी बाजारात गेली असता हरवली होती. याबाबत शहर पोलीस ठाणे मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर बालीकेला २४ तासाच्या आत शोधुन काढण्यात पोलीसांना यश आले होते. या बालीकेचे नाव संगीता राजू वळवी वय दहा वर्षे असुन तिचे आई- वडील नसल्याने ती आपल्या चुलत बहिनीकडे राहत आहे. तिच्या चुलत बहीणीची परिस्थीती देखील हालाकीची असल्याने या मुलीची शैक्षणिक वाटचाल ठप्प झाली होती.

आपल्या बहिणीबरोबर उघड्यावर राहणाऱ्या संगीताची परिस्थिती पाहता आपल्या कर्तव्याचा भावनेतून पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी तीच्या शैक्षणिक व आरोग्या वर खर्च करून माणुसकीच्या दृष्टिकोनातून संगीताने चांगले शिक्षण घेऊन आपले जीवन सुधारावे यासाठी पालकत्व स्वीकारण्याची इच्छा नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्याकडे व्यक्त केली असता संगीता सज्ञान होईपर्यंत पोलीस दल तिचा खर्च करेल असे त्यांनी सांगितले आहे. जिल्हा पोलीस दलाने उचलेल्या या पावलाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

लहानपणी आई वडील हरपल्याने आपल्या चुलत बहिणीकडे आश्रय घेत असलेल्या संगीताला अखेर खाकी वर्दीतील कर्तव्यातून आश्रय मिळाल्याने जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. आपली बदली झाल्यानंतरही संगीतासाठी आर्थिक खर्च करून चांगले आयुष्यमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी ग्वाही दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singapore Coronavirus Cases : कोरोनाचा पुन्हा कहर; रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे

Akola Accident: रॉग साईंडनं आलेल्या ट्रकनं कारला चिरडलं; कारचा चुराडा

Beed News : गाढ झोपेतच मृत्यूने गाढले; अंगावरून डंपर गेल्याने २ तरुणांचा मृत्यू

Andaman Monsoon News | अंदमानात मान्सूनची हजेरी,नागरिकांना दिलासा!

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT