nandurbar police distributes sweaters to needy citizens on new year eve saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : कडाक्याच्या थंडीत बेघरांना मायेची ऊब; नंदुरबार पोलिस अधीक्षकांचा उपक्रम

Happy New Year 2024: गतवर्षाला निराेप देताना आणि नव वर्षाचे स्वागत करताना पाेलिसांनी अनाेखा उपक्रम राबविला.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

थंडीत कुडकुडणाऱ्य नागरिकांना नवीन वर्षाच्या (new year 2024) सुरुवातीला नंदुरबार पोलिसांनी गरम कपड्यांचे वितरण करुन मायेची ऊब दिली. पाेलिसांनी रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड तसेच गावातील इतर भागात राहणाऱ्या बेघर शेकडो नागरिकांना उबदार कपड्यांचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (superintendent of police p r patil) यांच्या उपस्थित वाटप केले. (Maharashtra News)

31 डिसेंबरच्या रात्री बारा वाजे नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा जल्लोष आणि त्यातच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी कर्तव्यावर हजर होते.

स्वतः पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांना थंडीत कुडकुडणारी अनेक बेघर नागरिक दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नागरिकांना उबदार साहित्याचा वाटप करण्याचा निर्णय घेतला.

रात्रीतच या नागरिकांसाठी पांघरण्यासाठी आणि उबदार कपडे आणले गेले. तसेच वाटप करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने नवीन वर्ष सोशल पोलिसिंग माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याचा संदेश (Monday Motivation) पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कृतीतून दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT