Nandurbar Panchayat Samiti
Nandurbar Panchayat Samiti 
महाराष्ट्र

नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती पद जाणार आघाडीला!

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमानुसार रिक्त नंदुरबार व शहादा पंचायत समितीचे उपसभापती पदासाठी आज (२४ ऑक्टोंबर) निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुपारी १ वाजपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले असून यात आघाडीतर्फे कॉंग्रेसचे कमलेश महाले यांनी दोन तर भाजपतर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामांकन दाखल केले. सर्वसाधारण सभेनंतर उपसभापतीचे निवड होणार आहे. (Nandurbar-Panchayat-Samiti-Deputy-Chairman-post-to-go-to-the-mahavikas-aaghadi)

नंदुरबार पंचायत समितीच्‍या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे कमलेश महाले यांच्या अर्जावर सुचक म्हणुन संतोष साबळे व प्रल्हाद राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अर्ज दाखल करतांना बी. के. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गिरासे आदी उपस्थीत होते. तर भाजपतर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणुन सिमा जमदाळे यांची स्वाक्षरी आहे. अर्ज दाखल करतांना पं.स.सभापती प्रकाश गावीत उपस्‍थीत होते. नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता. यात भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

भाजपला दोन जागांचा फटका

निवडणुकीत भाजपला २ जागांचा फटका बसला असून शिवसेनेच्या २ जागा वाढल्या आहेत. सद्यस्थितीत पंचायत समितीत भाजपाचे ९, शिवसेनेचे ८ तर काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. त्यामुळे नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा उपसभापती निवडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

SCROLL FOR NEXT