Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Sangli Breaking News : सांगली, मिरज, कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणार असा धमकीचा फोन सांगली पोलिसांना आला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
Sangali Crime News
Sangali Crime NewsSaam TV
Published On

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगली, मिरज, कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणार असा धमकीचा फोन सांगली पोलिसांना आला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. धमकीच्या फोननंतर पोलिसांची देखील चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.

Sangali Crime News
Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सांगली शहर पोलिसांनी आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेड्या ठोकल्या आहेत. सचिन मारुती शिंदे, असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. धमकी देणारा संशयित आरोपी हा सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या तरडगाव येथील रहिवासी आहे.

त्याच्यावर पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वैफल्यग्रस्त होऊन ही धमकी दिल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली पोलिसांना आरोपीने शनिवारी फोन केला होता.

सांगली, मिरज, कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणार, अशी धमकी आरोपीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीला पोलिसांना सदरचा कॉल हा मॉकड्रिलचा भाग असल्याचं अंदाज होता.

मात्र तपासात हा कॉल खरा असल्याचं समोर आल्यानंतर त्यांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा आरोपीने हा कॉल मुंबईतून आल्याचं पोलिसांना कळालं. पोलिसांनी तातडीने लोहमार्ग पोलिसांसोबत संपर्क करत सीएसएमटी स्थानकावरून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Sangali Crime News
Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com