Nandurbar Zp School Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Zp School : जिल्हा परिषद शाळा भरते पत्र्याचे शेड असलेल्या झोपडीत; शहादा तालुक्यातील भयानक वास्तव

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रूपये निधी होतो. तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याची मोठी लाजीरवाणी परिस्थिती आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: आदिवासी भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सर्व सुविधांची वानवा असल्याचे पाहण्यास मिळते. तर येथील मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था देखील चांगली नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. कारण शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे. अर्थात येथे आल्यानंतर हि शाळा आहे कि गोठा असा अनुभव येत आहे. 

स्वातंत्र्याची ७८ वर्ष पूर्ण होऊनही शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील जिल्हा परिषदची शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे. ही फार मोठी दूर्दैवाची बाब आहे. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रूपये निधी होतो. तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत असल्याची केवढी मोठी लाजीरवाणी परिस्थिती आहे. भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

ध्वजारोहणासाठी बांबूचा दांडा 

विशेष म्हणजे शाळेत झेंडावंदन करण्यासाठी बांबूचा दांडा रोवण्यात आला आहे. आजूबाजूला कुडाच्या भिंती असून तेही झिरपले आहेत. त्यामुळे शेडमध्ये पाणी जाऊ नये, म्हणून आजूबाजूला बॅनर लावून शाळा बचावाचे कार्य सुरू आहे. ही जिल्हा परिषदची शाळा आहे की बकऱ्या बांधण्याचे शेड आहे? अशी शंका निर्माण होते. या शेडमध्ये वडगांव चिंचपाणी येथील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेत असतील, असा प्रश्न निर्माण होतो. 

शाळेसाठी पक्की इमारतीची मागणी 

दरम्यान अवकाळी पावसाने शेड पडू पडू झाले आहे. विद्यार्थांसाठी हे शेड धोकादायक आहे. आता शाळा सुरु होणार असून पावसाळ्यात येथे मुले बसून कसे शिक्षण घेणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तरी शहादा तालुक्यातील वडगांव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पक्की इमारत बांधकाम करून मिळावी; अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : उंचावरून कोसळणारे मुंबईजवळील ५ पांढरे शुभ्र धबधबे, 'ही' सुंदर ठिकाणे खूपच कमी लोकांना माहितेय

महागड्या औषधांची गरज पडणार नाही! 'हे' एक फळ हाय ब्लड प्रेशर करेल कंट्रोल, हृदयही राहील निरोगी!

Famous Actress : एकटीला बोलावलं अन्...; दिग्दर्शकाकडून प्रसिद्ध अभिनेत्रीला घाणेरडी वागणूक, सेटवर नेमकं झालं काय?

Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मे-जून हप्त्याची महत्त्वाची अपडेट

Hidden Cholesterol Marker: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल असूनही का येतो हार्ट अटॅक? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT