Navapur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Navapur Accident News: एकुलता एक मुलगा गेल्‍याने कुटुंबाचा आधार गेला; नवापूरला भीषण अपघातात युवकाचा मृत्‍यू

एकुलता एक मुलगा गेल्‍याने कुटुंबाचा आधार गेला; नवापूरला भीषण अपघातात युवकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

नवापूर (नंदुरबार) : राष्ट्रीय महामार्गावर नवापूर- धुळे रस्त्यावर बुधवारी (२८ जून) दुपारी तीनला भीषण अपघात (Accident) झाला. मोटारसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. युवक विसरवाडीजवळील बालआमराई (ता. नवापूर) येथील (Navapur) रहिवासी असून, एकुलता मुलगा अपघातात गेल्याने गावित परिवारासह बालआमराई गावावर शोककळा पसरली आहे. (Live Marathi News)

सुरतकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. ही घटना नवापूर तालुक्यातील सावरट गावालगत घडली असून, मोटरसायकल चालक महेंद्र अमृतसिंग गावित जागीच ठार झाला. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Police) तत्काळ रुग्णवाहिकाचालक लाजरस गावित यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला होता.

महामार्गावर पडल्‍या चाऱ्या

राष्ट्रीय माहामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर उन्हाळ्यात चाऱ्या पडल्या आहेत, काही भागात रस्ता दाबला गेल्याने चाऱ्या पडल्या आहेत. या चाऱ्यांमुळे लहान चारचाकी वाहनांना अडचणी येतात. त्यात दुचाकी वाहन चालविणे अवघड होते. या चाऱ्यांमुळे वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटतो. यात अपघात होण्याची शक्यता जास्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT