Nandurbar News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News: बापरे! लहान मुलांच्या कफ सिरपमध्ये अळ्या; अक्कलकुवामधील संतापजनक घटना

Worm In Cough Syrup: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक संतापजनक घटना घडली आहे. लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात.

Ruchika Jadhav

Nandurbar Crime News:

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक संतापजनक घटना घडली आहे. लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात. सदर घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोग्य केंद्रात ६ जानेवारी रोजी खोकल्याच्या उपचारासाठी एका बाळाला आणण्यात आले होते. रुग्णालयात डॉक्टरांनी या बाळाला तपासले आणि त्याला औषधे दिली. यात एक कफ सिरपची बॉटल देखील होती. कफ सिरप देताना सिरप झाकनात ओतून घेतले असता त्यात अळी असल्याचं दिसून आलं. त्यानंतर कुटुंबियांनी हे संपूर्ण औषध खाली ओतून पाहिलं. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

कारण या बॉटलमधील सिरपमध्ये बऱ्याच अळ्या झाल्या होत्या. यानंतर संबिधतांनी आमदार पडवी यांच्याकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि सदर घटनेबाबत तक्रार नोंदवली. सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला.

तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यासह हा औषध साठा अन्य ठिकाणी देखील गेला असेल तर तो सिल करण्यात यावा आणी संबधित कर्मचारी आणि पुरवठा दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत जेवणात, स्ट्रीट फूडमध्ये किंवा चॉकलेट आणि बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता थेट औषधामध्ये औषधामध्ये अळ्या निघाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापजनक वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

SCROLL FOR NEXT