Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: डोंगर आणि दुर्गम भागात ओला दुष्काळ जाहीर करावा; लोकसंघर्ष मोर्चाचे आंदोलन

डोंगर आणि दुर्गम भागात ओला दुष्काळ जाहीर करावा; लोकसंघर्ष मोर्चाचे आंदोलन

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाचा दुर्गम भागात आणि तळोदा, अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान झाले. या परिसरात ओला दुष्‍काळ जाहीर करावा; यासाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले जात आहे. (Tajya Batmya)

सातपुड्याच्या डोंगरांमध्ये सतत होणाऱ्या (Rain) पावसामुळे या वर्षाचा खरीप हंगाम वाया गेला असला तरी प्रशासनाच्यावतीने (Nandurbar News) आदिवासी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच या आदिवासी बांधवांचे वन हक्क दावे फेटाळण्यात आले आहेत. त्या परिवारांचे वनहक्क दावे त्वरित मंजूर करण्यात यावे. यासह आदी मागण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

कार्यकर्ते व पोलिसात शाब्‍दीक चकमक

यावेळी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाल्याचे ही पाहण्यास मिळाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मागण्यांची पंधरा दिवसात दखल घेतली गेली नाही; तर दिल्लीत आंदोलनाचा इशारा लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी मंत्री पद्माकर वडवी त्यासोबत लोक संघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT