Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave: सावधान..आठवडाभर उष्णतेची लाट; नंदुरबारमध्‍ये पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज

सावधान..आठवडाभर उष्णतेची लाट; नंदुरबारमध्‍ये पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ (Heat Wave) झाली आहे. आठवड्याभरात कमाल (Temprature) तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असल्याने अचानक तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त राहील. कमाल तापमानात वाढ होऊन पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरात तापमानात प्रचंड अशी वाढ होणार असून मे हिटचा तडाखा जाणवायला सुरवात झाली आहे. या काळात नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी लागवड करण्यात आलेल्या फळ पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. तर नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या काळात बाहेर पडू नये. उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

SCROLL FOR NEXT