Nandurbar Water shortage Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Water Shortage : भर पावसाळ्यात नंदुरबारकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा; धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यात देखील तीच परिस्थिती आहे. धरणात पाणी साठा कमी असल्याने नंदुरबार शहरात करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. हि कपात आता देखील कायम असून पावसाळ्याच्या दिवसात देखील नंदुरबार शहरामध्ये पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. 

राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा असल्याने (Nandurbar) नंदुरबार शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या १३ लघु प्रकल्पांमध्येही अत्यल्प पाणीसाठा आहे. 

दमदार पावसाची प्रतीक्षा 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्याने सध्या तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि नंदुरबार शहरावर पाणी टंचाईचे (Water Scarcity) संकट उभे आहे. यामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिने होण्यात आले; तरीही नंदुरबार जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचे संकट उभे राहू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canara Bank Job: कॅनरा बँकेत बंपर ओपनिंग, तब्बल ३००० पदांसाठी भरती; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Tirupati Balaji : बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी, धक्कादायक दावा

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT