Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : धार्मिक कार्यक्रमात जेवणातून संपूर्ण गावाला विषबाधा; नंदुरबार तालुक्यातील घटना

Nandurbar News : गावातील एक एक जणाला टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावातील नागरिकांना हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी गेले. यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातील सर्व ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात आयोजित एका कार्यक्रमात जेवणात वितरित करण्यात आलेला पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्रास होत असलेल्या ग्रामस्थांना लागलीच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नंदुरबार तालुक्यातील भिलईपाडा या गावात हि घटना घडली आहे. गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना काही पदार्थ वितरित करण्यात आले होते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या आणि जुलाबाच्या त्रास जाणवू लागला होता. एक एक करून संपूर्ण गावातील नागरिकांना हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी गेले. यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

संपूर्ण गावाला विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित रुग्णालयात दाखल झाले असून रुग्णांची विचारपूस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT