Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : आठ दिवसापासून अवकाळीचे थैमान; काढणी केलेला कांदा शेतातच सडू लागला, शेतकरी हतबल

Nandurbar News : महिन्याच्या सुरवातीपासूनच अधूनमधून अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. तर मागील आठ दिवसांपासून रोज वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्यात आठवडाभरापासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील गेल्या आठ दिवसापासून रोज अवकाळी पाऊस येत असल्याने जिल्ह्यात प्रचंड नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून काढणी केलेला कांदा आता शेतातच सडू लागला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. प्रामुख्याने फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. तसेच मका, कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासूनच अधूनमधून अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. तर मागील आठ दिवसांपासून रोज वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. शिवाय शेती तयार करण्यात देखील अडचणी येत आहेत. 

काढणी केलेला कांदा होतोय खराब 
नंदुरबार तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी सुकलाल आधार खंदारे यांनी त्यांच्या तीन एकर शेतात जानेवारी कांद्याची लागवड केली होती. लागवड, मजुरी, फवारणी या मशागतीतून त्यांना दीड लाखाचा खर्च आला. त्यांनी कांदा काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सहा दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी कपाशीचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा काढून ही त्यांना भरपाई मिळाली नाही. कांद्याचा पिक विमा काढत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे

पावसामुळे फळ बागांना फटका
नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे ३ एकर टरबुज पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने लावलेल्या तीन एकर क्षेत्रातील टरबूज खराब झाले असून नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकासाठी लावलेला दीड ते २ लाखांचा खर्च यामुळे वाया गेला आहे. तर नुकसान झाल्याने ५ लाखांचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT