Rain Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: नंदुरबार जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस; खांडबारा आठवडे बाजारात धावपळ

नंदुरबार जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस; खांडबारा आठवडे बाजारात धावपळ

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील विसरवाडी आणि खांडबारा परिसरामध्ये दुपारी अवकाळी पावसाला (Rain) अचानक सुरुवात झाली. यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. तसेच रविवारी खांडबारा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व्यापारी व भाजीपाला विक्रेतांची मोठी धावपळ झाली. (Breaking Marathi News)

दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र उकाळा जाणवत होता. तसेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचप्रमाणे नवापूर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा गावासह परिसरात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवार दुपारी तीन वाजून ४५ मिनिटानंतर विसरवाडी गावासह परिसरात १५ मिनिट पावसाने हजेरी लावली.

अचानक आलेल्‍या पावसामुळे शेतकऱ्यांसह (Farmer) धान्य व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली असून धावपळ सुरू झाली होती. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामाचे किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागात दिला आहे. त्यामुळे उघड्यावर पिकं किंवा अन्य वस्तू ठेवू नये अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT